Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कांदा सायीची भाजी

कांदा सायीची भाजी
, मंगळवार, 23 ऑगस्ट 2016 (17:35 IST)
साहित्य - 2 कप चिरलेला कांदा, 4 चमचे टोमॅटो प्युरी, 1/2 कप दुधाची साय, 1 चमचा चिरलेली हिरवी मिरची, चिमूटभर हिंग, 1/2 चमचा हळद, 1 लहान चमचा जिरं, 1 लहान चमचा धणेपूड, 1 मोठी वेलची, 1/2 लहान चमचा कसूरी मेथीची पूड, चवीनुसार मीठ,  2 लहान चमचे तेल.  
 
कृती : सर्वप्रथम कढईत तेल गरम करा, त्यात जिरं, हिंग व मोठी वेलचीचे तुकडे घालून थोडे परतून घ्या. हळद, धणे पूड आणि कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. टोमॅटोची प्युरी आणि मीठ घालून 2 मिनिटापर्यंत कमी आचवर शिजवा.  
 
साय घालून 4-5 मिनिटापर्यंत हळू आचीवर शिजू द्या.  
 
गॅस बंद करून वरून कसूरी मेथीची पूड घालून गरम गरम भाजी पराठे किंवा पोळीसोबत सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोपाळकाला : जन्माष्टमी विशेष