Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्रेड पेटीस

ब्रेड पेटीस
साहित्य: 1 वाटी उकळून मॅश केलेले बटाटे, 2 ब्रेड स्लाइस, तिखट, धणेपूड, बडीशेप, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ.
आत भरण्यासाठी: 1/4 वाटी मूग डाळ, तेल, 1/4 चमचा भरडसर धणे, 1/4 चमचा भरडसर बडी शेप, गरम मसाला, चिमूटभर आमचूर पावडर, मीठ, काळं मीठ, हळद, पाणी.
कृती: ब्रेड स्लाइस पाण्यात टाकून लगेच बाहेर दाबून पाणी काढून घ्या. ही ओली ब्रेड मॅश केलेल्या बटाट्यात टाका. तिखट, धणेपूड, बडीशेप, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ टाकून मळून घ्या.
 
आता मूग डाळ, मीठ आणि हळद टाकून फक्त एक दोन उकळी घेऊन घ्या. ‍डाळ पूर्ण पणे शिजवून नका. कढईत 1 चमचा तेल गरम करून मंद आचेवर धणेपूड, बडीशेप टाकून डाळ आणि भरावनसाठी दिलेले सर्व साहित्य टाकून मिसळून घ्या. मिश्रण 3-4 मिनटापर्यंत परता.
 
आता मळलेल्या पिठाचे लिंबाच्या आकाराएवढे गोळे करा. मग चपटे करून आत भरावनाचे छोटे गोळे त्यात ठेवून चारी बाजूने बंद करा. तळहाताच्या मदतीने पुन्हा गोल करा. गरम तेलात एक-एक करून तळून गोल्डन होयपर्यंत तळून घ्या. चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्यायाम न करता कमी करा पोटावरची चरबी, 5 सोपे उपाय