Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मसाला दाल-बाटी

मसाला दाल-बाटी
, सोमवार, 23 मार्च 2015 (12:42 IST)
मसालाबाटी साहित्य : सारणासाठी : उकडलेल्या बटाटय़ाचा लगदा, हळद, तिखट, पादेलोण, आमचूर, साखर, मीठ, काजू, किसमिस. सर्व बटाटय़ाच अंदाजाने घेऊन एकत्र करा.
 
दाल साहित्य व कृती : मूग, मसूर, तुरीची, चण्याची, उडदाची डाळ सर्व. डाळी 2-2 टेबलस्पून घ्या. हळद, तिखट, मीठ घालून शिजवा. फोडणीसाठी साजूक तूप, चिरलेलं आलं, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हिंगपूड, जिरे. तयार डाळीवर फोडणी घाला.
 
वरच्या पारीसाठी : जाडसर कणीक, पाणी, दही, मीठ, तूप थोडंसं, हळद, ओवा, चिमूटभर सोडा.
 
कृती : पीठ भिजवा. पिठाच्या वाटीत बटाटय़ाचं सारण भरून, गुलाबजामसारखं मंद गॅसवर तळा. (8-10 मिनिटे तळाला लागतील इतका मंद गॅस ठेवा) मिक्स दालबरोबर द्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi