Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'सातू'ची बाटी

'सातू'ची बाटी

वेबदुनिया

साहित्य : २०० ग्रॅम सातू, चार वाटी कणीक, एक वाटी दूध, मीठ अंदाजे, एक लहान चमचा काळेमिरे पूड, चार हिरव्या मिरच्या बारीक काप केलेल्या, कोथिंबीर कापलेला, एक चमचा ओवा, 2 चमचे शोप जाडसर वाटलेली, एक लहान चमचा हिंग पाण्यात घोळलेला, चिमूट भर खाण्याचा सोडा, साजुक तूप. 

कृती : कणकेत मीठ व सोडा घालावा, दूध व एक मोठा चमचा तूप गरम करून त्याने कणीक चांगली मळून घ्यावी. सातूत सर्व मसाले घालून चिरलेली  कोथिंबीर व मिरच्या घालाव्या. एक लहान चमचा तेल गरम करून त्यात घालावे. कणकेचे एका आकाराचे बॉल्स तयार करावे. बॉल्सच्या मधोमध एक-एक मोठा चमचा सातुचे तयार मिश्रण घालावे आणि बॉल्सला चांगल्या प्रकारे बंद करावे. ओव्हन गरम करून बाट्या भाजून घ्याव्या. भाजून झाल्यावर गरम तुपात हलक्या हाताने दाबून त्या काढून घ्याव्या. गरमा-गरम वरण, कढी आणि चटणी सोबत सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi