साहित्य -
1 कप अख्खी उडीद डाळ, 1/4 कप चणा डाळ, मीठ चवीप्रमाणे, 2 चमचे आलं-लसूण पेस्ट, 1/2 चमचा हळद पावडर,
फोडणी साठी -4 चमचे तूप, 1 तुकडा दालचिनी, 1 चमचा जिरे, 2 चमचे आलं-लसूण पेस्ट, 1/2 कप बारीक चिरलेला कांदा 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1कप बारीक चिरलेलं टॉमेटो, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आमसूल पूड, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर सजविण्यासाठी.
कृती -
उडीद डाळ आणि चण्या डाळीला धुऊन चार कप पाण्यात मीठ, आलं लसूण पेस्ट आणि हळद टाकून कुकराला लावावे आणि 3 शिट्या द्यावे. गॅस बंद करा कुकराचे दाब निघाल्यावर डाळ काढून चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. आता एका कढईत तूप गरम करण्यास ठेवावे. त्यामध्ये जिरे, दालचिनी घाला, नंतर आलं लसूण पेस्ट आणि कांदा घाला. कांद्याला सोनेरी रंग येई पर्यंत शिजवून घ्या. आता या मध्ये हिरव्या मिरच्या आणि टॉमेटो घाला. टॉमेटो शिजवल्यावर तिखट, आमसूल पावडर, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला घालून मिसळा. तीन चे चार चमचे पाणी कढईत टाकावे.
सर्व मसाल्यांना मंद आचेवर परतून घ्या. डाळींना कढईत टाकून परतून घ्या. 4 ते 5 मिनिटे मध्यम आचेवर मसाल्यांसह शिजवावे. आता गॅस बंद करा. कोथिंबिरीने सजवावे. गरम अमृतसरी डाळ तयार डाळ नान किंवा पराठ्यासह सर्व्ह करावी.