Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तम कुकिंग टिप्स आवर्जून अवलंबवा

उत्तम कुकिंग टिप्स आवर्जून अवलंबवा
, सोमवार, 18 जानेवारी 2021 (23:05 IST)
* बटाट्याचे पराठे चविष्ट बनविण्यासाठी कणकेत उकडलेले बटाटे किसून मिसळा.
* पराठे तेल किंवा तुपा ऐवजी लोणीत शेकावे पराठे अधिकच चविष्ट बनतात. 
* ग्रेव्ही ला घट्ट करण्यासाठी या मध्ये सातूचे पीठ मिसळा या मुळे ग्रेव्ही घट्ट होईल आणि चविष्ट देखील बनेल.
* भजे करताना या घोळात चिमूटभर आरारूट आणि थोडंसं गरम तेल मिसळावे या मुळे भजे अधिक कुरकुरीत आणि चविष्ट बनतात.
* भजे सर्व्ह करताना या वर चाट मसाला भुरभुरा, या मुळे हे अधिक चविष्ट लागतात.
*  भेंडी बऱ्याच काळ ताजी ठेवण्यासाठी भेंडीवर मोहरीचे तेल लावा.
* नूडल्स उकळताना उकळत्या पाण्यात थोडंसं मीठ आणि तेल घाला नंतर पाण्यातून नूडल्स काढल्यावर थंड पाण्याने धुऊन घ्या. नूडल्स चिटकणार नाही.
* पुऱ्या खमंग बनविण्यासाठी कणीक मळताना त्यामध्ये एक चमचा रवा किंवा तांदुळाची पिठी घाला. पुऱ्या खुसखुशीत बनतील.
* पुऱ्याची कणीक मळताना कणकेत एक लहान चमचा साखर घालून  कणीक मळा पुऱ्या फुगतात.
* पनीर घट्ट असल्यास त्या मध्ये चिमूटभर मीठ घातलेल्या कोमट पाण्यात 10 मिनिटा साठी ठेवा पनीर मऊ पडेल.
* तांदूळ शिजवताना पाण्यात लिंबाचा रस मिसळल्याने तांदूळ पांढरे  मोकळे आणि चविष्ट बनतात.
* कांदा तळताना थोडी साखर टाकल्यानं कांदा लवकर तांबूस रंगाचा होतो.
* पनीर बनवल्यावर उर्वरित पाण्यात कणीक मळल्याने तंदुरी पोळी मऊ बनते.
* डाळीचे धिरडे बनवताना घोळात दोन मोठे चमचे तांदळाची पिठी घाला. धिरडे खुसखुशीत आणि खमंग बनतात. 
*इडली -डोस्याचे मिश्रण आंबट झाले असल्यास या मिश्रणात नारळाचं दूध मिसळा आंबटपणा निघून जाईल.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विविध कोळी