rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Bhai Dooj 2025 भावाला खूश करण्यासाठी बनवा खास थाळी, जाणून घ्या सोप्या पाककृती

Bhai Dooj Recipes
, गुरूवार, 23 ऑक्टोबर 2025 (08:00 IST)
जिरा राईस
साहित्य-
बासमती तांदूळ - एक कप 
तूप किंवा तेल -दोन टेबलस्पून
कोथिंबीर- दोन टेबलस्पून
जिरे - एक टीस्पून 
लिंबू - एक 
मोठी वेलची
लवंगा
काळी मिरी 
दालचिनीचा तुकडा 
मीठ चवीनुसार
 
कृती-
सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून १/२ तास पाण्यात भिजवा. अर्ध्या तासानंतर, तांदळातील जास्तीचे पाणी काढून टाका. एका भांड्यात तूप गरम करा, तूप गरम झाल्यावर त्यात जिरे घाला आणि परतवून घ्या. आता त्यात संपूर्ण मसाले, दालचिनी, काळी मिरी, लवंगा आणि वेलची घाला व परतवून घ्या, आता भिजवलेले तांदूळ घाला. तांदूळ मसाल्यांमध्ये मिसळा आणि चमच्याने सतत ढवळत दोन मिनिटे परतून घ्या. आता दोन कप पाणी घाला, मीठ घाला आणि लिंबाचा रस पिळून घ्या आणि तो भातामध्ये घाला व चांगले मिसळा, आता पाच मिनिटे मंद आचेवर तांदूळ शिजू द्या, साधारण पाच मिनिटांनी तांदूळ उघडा आणि ते तपासा.  तांदूळ पुन्हा झाकून ठेवा आणि मंद आचेवर साधारण पाच मिनिटे शिजू द्या, तांदूळ शिजल्यानंतर गॅस बंद करा. व झाकून ठेवा सदाहरण १५ मिनिटे तसेच राहू द्या. आता तयार जिरा राईस वर कोथिंबिर गार्निश करा. तर चला तयार आहे आपला जिरा राईस रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा. 
 
कश्‍मीरी पनीर मसाला
साहित्य-
पनीर -३५० ग्रॅम
मोहरीचे तेल 
पाणी 
हिंग चिमूटभर
दालचिनी -दोन काड्या
तमालपत्र -दोन 
हिरवी वेलची -सहा 
जिरे -अर्धा टीस्पून
टोमॅटो प्युरी -तीन टेबलस्पून
काश्मिरी मिरची पावडर -एक टीस्पून
आले पावडर -अर्धा टीस्पून
बडीशेप पावडर -एक टीस्पून
ग्रीक दही -दोन टेबलस्पून
केशर चिमूटभर
गरम मसाला पावडर -एक चिमूटभर
मीठ चवीनुसार
कोथिंबीर  
कृती- 
सर्वात आधी एका भांड्यात ५०० मिली गरम पाणी घाला आणि बाजूला ठेवा. नंतर पनीरचे चौकोनी तुकडे करा आणि एका फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करा आणि पनीरचे चौकोनी तुकडे सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. आता तळलेले पनीर एका भांड्यात गरम पाण्यात घाला. नंतर एका पॅनमध्ये तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात हिंग घाला आता त्यात दालचिनी, तमालपत्र आणि हिरवी वेलची घाला. मसाले एक मिनिट परतून घ्या आता जिरे घाला व परतून घ्या. नंतर टोमॅटो प्युरी घाला. आता त्यात मिरची, आले आणि बडीशेप पावडर घाला. व परतवून घ्या आता त्यात वाटीतील  पनीर द्रव घाला आणि मध्यम आचेवर शिजू द्या. तसेच ग्रेव्हीमध्ये केशर किसून घ्या आणि दह्यासोबत फेटा. व काही मिनिटे उकळवा आणि आता पनीरचे तुकडे ग्रेव्हीच्या भांड्यात हळूवार घाला. व चांगल्याप्रकारे मिक्स करा. आता वरून कोथिंबीर आणि गरम मसाला गार्निश करा. तर चला तयार आहे आपली काश्मिरी पनीर मसाला रेसिपी,  पराठ्यासोबत  नक्कीच सर्व्ह करा. 
 
छोले-भटूरे
साहित्य- 
छोले
आले-लसूण पेस्ट
कांदा
खोबरे
धने
मिरे
वेलची पूड
तमाल पत्र
तिळ
काजू
बडीशोप
टमाटे
 
कृती- 
सर्वात आधी छोले रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. आता कूकरमध्ये उकळवून घ्या. आले-लसूण पेस्ट, कांदा, वेलची पूड, मिरी, भिजविलेले काजू व तिळ, टमाटे, बडिशोप, धणे, खोबरे हे मिक्सरमधून एकत्र पेस्ट करून घ्या. नंतर कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी व तमालपत्र टाका. नंतर वरिल पेस्ट टाका. गुलाबी रंग आल्यावर त्यात तिखट, मसाला, हळद टाकून तेल सूटेपर्यंत हलवत रहा. त्यात छोले टाकून चवीनुसार मीठ टाका. आवडीप्रमाणे पाणी टाकून मिश्रणाला उकळी येऊ द्या. त्यात कोथ‍िंबीर टाका.
 
भटूर्‍यांचे साहित्य-
मैदा
दही
रवा 
मीठ 
 
कृती-
सर्वात आधी रवा-मैद्यात दही व मीठ टाका. थोडे-थोडे पाणी टाकून जास्त घट्टही नाही व सैलही नाही असे भिजवा. पाच तास झाकून हे मिश्रण मुरू द्या. व नंतर पुर्‍या लाटून तेलात तळून घ्या.
 
ड्रायफ्रूट बर्फी 
काजू - एक कप
बदाम - अर्धा कप
पिस्ता -अर्धा कप
मनुका - एक टेबलस्पून
तूप - दोन टेबलस्पून
खजूर- दहा तुकडे
खवा - दोन टेबलस्पून
वेलची पूड -अर्धा टीस्पून
चांदीचा फॉइल  
 
कृती- 
सर्वात आधी एक पॅन गरम करा आणि काजू, बदाम आणि पिस्ता भाजून घ्या. आता बदाम, काजू, पिस्ता आणि मनुके ग्राइंडरमध्ये ठेवा आणि बारीक वाटून घ्या. सर्व खजूर पाण्याने चांगले धुवा आणि त्यांचे लहान तुकडे करा. नंतर, मिक्सर जारमध्ये थोडे पाणी घाला आणि गुळगुळीत पेस्ट बनवा. आता एका पॅनमध्ये तूप गरम करा, त्यात ड्रायफ्रूट पावडर घाला आणि सतत ढवळत राहा. जेव्हा त्याचा वास मंद वास येऊ लागतो तेव्हा त्यात खजूराची पेस्ट आणि खवा घाला, सतत ढवळत राहा जेणेकरून ते तळाशी जळणार नाही. तसेच तुप मिश्रणापासून वेगळे होईपर्यंत शिजवा. जेव्हा ते हलके सोनेरी रंगाचे होते आणि सुगंध येऊ लागते तेव्हा ते तयार आहे. आता वेलची पूड घाला, मिक्स करा आणि वर चिरलेले ड्रायफ्रूट शिंपडा. गॅस बंद करा.
आता, एका प्लेटमध्ये तूप लावा आणि तयार केलेले मिश्रण ठेवा. ते थंड होईपर्यंत एक ते दोन तास तसेच राहू द्या. तयार केलेल्या बर्फी मिश्रणात चांदीचे फॉइल घाला आणि ते इच्छित आकारात कापून घ्या.
 
चॉकलेट बर्फी 
साहित्य-
मावा - दोन कप
साखर - तीन चमचे
गुलाब पाणी - एक टीस्पून
वेलची पूड - एक टीस्पून
कोको पावडर - दोन चमचे
चिरलेले बदाम - दोन चमचे
 
कृती-
सर्वात आधी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यात मावा भाजून घ्यावा, माव्यामध्ये साखर, वेलची पूड आणि गुलाबजल घाला, मिक्स करा आणि आणखी काही वेळ शिजवा. मावा व्यवस्थित शिजला की, एका ट्रेवर तूप लावा आणि त्यावर अर्धा मावा पसरवा. उरलेल्या अर्ध्या माव्याच्या मिश्रणात कोको पावडर मिसळा आणि ट्रेमध्ये पसरलेल्या माव्यावर चांगले पसरवा आणि ते सेट होऊ द्या. ट्रे २ तास फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर इच्छित आकारात कापून घ्या. तर चला तयार आहे आपली चॉकलेट बर्फी रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे तरुणांमध्येही पाठदुखी होऊ शकते