साहित्य : 1 ओले नारळ, 4-5 ओल्या लाल मिरच्या, एक लहान चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ, 2 मोठे चमचे दही, चवीप्रमाणे हिंग, मोहरी, कढीपत्ता
कृती : ओले नारळ खवायचे, ओल्या लाल मिरच्या, जिरे, मीठ, दही हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. नंतर तेलात हिंग, मोहरी, कढी पत्ता टाकून वरून फोडणी द्यायची. ही चटणी इडली, डोसा, उत्तपम, वडे या सोबत सर्व्ह करता येते.