साहित्य- प्रत्येकी १ वाटी बारीक चिरलेला पुदिना, पातीचा कांदा, पालक, मटार दाणे, २ बटाटे उकडलेले, अर्धी वाटी ब्रेडचा चुरा, १ टी. स्पू. गरम मसाला, २ टे. स्पू. हिरवी मिरची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट, जिरपूड, मीठ, आमचूर पावडर, थोडी साखर, २ टे.स्पू. कॉर्न फ्लोअर
कृती - सर्व पालेभाज्या स्वच्छ धुवून घेऊन मिक्सरमधून बारीक वाटून घ्याव्यात. मटार दाणे जाडसर भरडून घ्यावेत. पालेभाज्या, मटार दाणे, मीठ एकत्र करून ते मिश्रण कोरडं होण्याइतपत गरम करावं. मिश्रण गार करून त्यात बटाटा किसून गरम मसाला, हिरवी मिरची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट, जिरं पूड, आमचूर पावडर, साखर, ब्रेडचा चुरा हे सर्व जिन्नस एकत्र करावं. गरजेनुसार त्यात कॉर्न फ्लोअर टाकावं.हे मिश्रण घट्टसर असावं. त्याचे लहान गोळे बनवून त्यांना चपटा आकार द्यावा. नॉनस्टिक तव्यावर दोन्ही बाजूंनी मंद आचेवर पॅटिस खमंग भाजून घ्यावेत आणि टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम खाण्यास द्यावेत.