Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कधी ट्राय केले आहे का मटारचे सूप, चला जाणून घेऊ या रेसिपी

कधी ट्राय केले आहे का मटारचे सूप, चला जाणून घेऊ या रेसिपी
, बुधवार, 10 जानेवारी 2024 (16:45 IST)
Green peas soup recipes : थंडीमध्ये गरम-गरम सूप सेवन करण्याची मज्जाच 
काही और आहे. मटार हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात अगदी दररोजच्या दैनंदिन 
आहारात पण तुम्ही मटारचे सेवन करू शकतात म्हणूच चला जाणून घेऊया मटारची ही स्वादिष्ट सूप रेसिपी.  
साहित्य -
2 कप उकडलेली मटार, 2 कप पालक, 1 कांदा.
सोबत लसणाच्या 4 पाकळ्या, 1 छोटा आल्याचा तुकडा. 
 2हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा जीरे, 2 तेजपान, 1वेलदोडा 
1 तुकडा दालचीनी, चवीप्रमाणे मीठ आणि गरजेप्रमाणे तेल. 
कृती -
सर्वप्रथम आधी आलं , लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घ्यावी. 
 मटारला आणि पालकला बारीक करून प्यूरी करून घ्यावी. 
 एका पॅन  मध्ये तेल गरम करून घ्यावे. तसेच त्यात जीरे, वेलदोडा, दालचीनी, तेजपान टाकून परतून घ्यावे .
 यानंतर कांदा परतून घ्यावा. मग लसूण आल्याची पेस्ट टाकावी.
 यानंतर मटर-पालकची प्यूरी टाकावी आणि मग पाच मिनिटा पर्यंत शिजवून घ्यावे.
आवश्यकतेनुसार मीठ आणि पाणी टाकून घ्यावे, चला तर मग गरम मटार सूप तयार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओशनोग्राफी मध्ये करिअर करा, पात्रता जाणून घ्या