Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हॉटेलसारखी बिर्याणी घरीच बनवा: ही पद्धत आजपर्यंत कुणीच सांगितली नसेल! अचूक चवीसाठी खास सिक्रेट टिप्स

veg biryani recipe
, बुधवार, 12 नोव्हेंबर 2025 (12:49 IST)
हॉटेल स्टाइल बिर्याणी बनवण्यासाठी यात भाज्या, मसाले आणि तांदूळ एकत्र शिजवले जातात, ज्यामुळे सुगंध आणि चव हॉटेलसारखी येते.
साहित्य-
तांदूळ- २ वाट्या बासमती तांदूळ  
भाज्या-१ मोठा बटाटा,१ गाजर
१५० ग्रॅम फ्लॉवर, १ कप हिरवे वाटाणे, १ मोठा कांदा, २ टोमॅटो
१ कप दही
१ चमचा आले-लसूण पेस्ट  
१ चमचा लाल तिखट
१ चमचा धने पूड
½ चमचा हळद  
१ चमचा गरम मसाला
१ चमचा बिर्याणी मसाला
२-३ हिरवी वेलची
४-५ लवंगा
१ इंच दालचीनी
२ तमालपत्र
१ तारका (स्टार अनीस)
१ चमचा जिरे
१०-१५ पुदीना पाने
१०-१५ कोथिंबीर
५-६ केशर धागे (१/४ कप दुधात भिजवलेले)
४ चमचे तूप/तेल
२ चमचे तळलेले कांदे
२ चमचे काजू (तळलेले)
१ चमचा गुलाबजल
पाणी-४ वाट्या
मीठ

कृती-
सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून ३० मिनिट पाण्यात भिजवा, नंतर गाळून ठेवा. आता भाज्या कापून घ्या. दह्यात आले-लसूण पेस्ट, सर्व मसाले पावडर, मीठ घालून भाज्या १५ मि. मॅरिनेट करा. आता केशर दुधात भिजवा. कांदा लांब स्लाइस करून सोनेरी तळून बिरिस्ता बनवा. आता मोठ्या भांड्यात ६-७ वाट्या पाणी उकळा. त्यात १ तमालपत्र, २ वेलची, ३ लवंगा, १ चमचा मीठ, १ चमचा तेल घाला. व भिजवलेले तांदूळ घाला. ७०% शिजवा. आता गाळून थंड पाण्याने धुवा व बाजूला ठेवा. आता मोठ्या कढईत ३ चमचे तूप गरम करा. जिरे, वेलची, लवंगा, दालचीनी, तमालपत्र, तारका घालून तडतडा. तसेच स्लाइस कांदा घालून गोल्डन ब्राउन तळा. चिरलेले टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. मॅरिनेट भाज्या घाला. ५-७ मिनिट मध्यम आचेवर शिजवा. तसेच पुदीना-कोथिंबीर अर्धी घाला. गरम मसाला आणि बिर्याणी मसाला शेवटी घाला. आता जाड तळाच्या हांडीत १ चमचा तूप लावा.
पहिली लेयर- अर्धे शिजलेले तांदूळ पसरवा. त्यावर केशर दूध, गुलाबजल, तळलेले कांदे, काजू, पुदीना-कोथिंबीर शिंपडा.
दुसरी लेयर-सर्व भाज्या ग्रेव्ही पसरवा.
तिसरी लेयर- उरलेले तांदूळ घाला. वर तूप, बिरिस्ता, केशर दूध, पुदीना शिंपडा.
हांडी झाकण लावून सील करा. हाय फ्लेम ५ मिनिट. नंतर लो फ्लेम २०-२५ मिनिट शिजवा आता हलकेच मिक्स करा. तर चला तयार आहे आपली अगदी हॉटेल सारखी बिर्याणी रेसिपी, रायता, सलाद सोबत सर्व्ह करा.
ALSO READ: घरीच बनवा अगदी रेस्टॉरंट सारखी स्वादिष्ट मिक्स व्हेजिटेबल रेसिपी
चवीसाठी खास सिक्रेट टिप्स
बासमती तांदूळ वापरा. लांब दाणे आणि सुगंध असलेला
गॅस बंद करून १० मिनिट उघडू नका.स्टीम सुगंध वाढवते.
सुगंध बूस्ट म्हणजेच केवडा वॉटर + रोझ वॉटर शिंपडा.
घरचेच साहित्य तळा. २ कांदे तेलात सोनेरी तळा.
तसेच घरचा बिर्याणी मसाला दगडफूल, जायफळ, जावंतरी भाजून वाटा.
व तूप कमी करा, एअर फ्रायरमध्ये भाज्या रोस्ट करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: घरीच झटपट बनवा अगदी हॉटेल स्टाईल बटाट्याचे कटलेट
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Pneumonia Day 2025 : जागतिक निमोनिया दिवस