Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पावसाळ्यात घरच्या घरी स्ट्रीट फूडचा आस्वाद घ्यायचा असेल तर बनवा टेस्टी दाबेली

Dabeli
, गुरूवार, 15 ऑगस्ट 2024 (07:40 IST)
दाबेली हा एक पदार्थ आहे जो गुजरात आणि महाराष्ट्रातील लोकांचा आवडता आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हा पदार्थ प्रसिद्ध असून मोठ्या प्रमाणात बनवला जातो. दाबेली ही जशी दिसायला सुंदर आहे तशी ती चवीला देखील अप्रतिम लागते. तर चला जाणून घ्या दाबेली कशी बनवावी.
 
साहित्य-
8 पाव
6 चमचे लोणी
1/4 कप शेव
1 लवंग
1 टीस्पून जिरे
2 बटाटे
1 मोठा चमचा कोथिंबीर  
1/4 कप कच्चे शेंगदाणे
2 बारिक कापलेले कांदे
6 चमचे चिंचेची चटणी
1 चमचा धणे 
2 लाल मिरच्या
1 चमचा जिरे
आवश्यकतेनुसार मीठ
1/2 दालचिनीची काडी
1/2 चिमूटभर हिंग
6 चमचे हिरवी चटणी
3 टीस्पून लसूण मियोनीज 
1/4 कप डाळिंब
 
कृती-
सर्वात आधी सॉसपॅन ठेवावा. मग यामध्ये लवंगा, दालचिनी, धणे आणि लाल मिरची तळून घ्या. आता बटाटे उकडवून घ्यावे. थंड करून ते सोलून ह्या व मॅश करावे. भाजलेले मसाल्याचे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या. दुसऱ्या पॅन मध्ये  तेल गरम करा. व त्यामध्ये जिरे घाला. आता यामध्ये हिंग, मसाला, मॅश केलेले बटाटे, पाणी आणि मीठ घाला आणि चांगले मिसळा. तसेच आता गॅसवरून तवा काढून त्यात चिंचेची चटणी घालावी. सर्व साहित्य चांगले मिक्स करावे. आता पाव घ्या आणि अर्धे कापून घ्या. आता तवा ठेऊन त्यावर लोणी टाकून पाव भाजून घ्या. आता पावाच्या खालील भागावर हे तयार केले मिश्रण घालावे व त्यावर चिरलेला कांदा, शेव, हिरवे धणे, डाळिंब, शेंगदाणे, 5 चमचे हिरवी चटणी आणि लसूण मेयोनेझ घालावे. व पावाच्या उरलेल्या अर्ध्या भागाने ते झाकून ठेवावे. उरलेली दाबेली त्याच पद्धतीने तयार करा. तसेच 1 टेबलस्पून हिरवी चटणी दाबेलीवर घालावी. तर चला तयार आहे आपली चविष्ट, लाजतदार दाबेली सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जास्त प्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्याने शरीराला होऊ शकतात हे 7 नुकसान