Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंतप्रधान मोदींची 'झालमुडी'चा सगळीकडे डंका! घरच्या घरी कशी बनवायची? सोपी पद्धत जाणून घ्या

साहित्य:
चुरमुरे (मुरमुरे): २-३ कप (कुरकुरीत असावेत)
उकडलेला बटाटा: १ मध्यम (बारीक चिरलेला)
कांदा: १ मध्यम (बारीक चिरलेला)
टोमॅटो: १ छोटा (बारीक चिरलेला)
काकडी: १/४ कप (बारीक चिरलेली)
हिरवी मिरची: १-२ (बारीक चिरलेली)
भिजवलेले किंवा उकडलेले काळे चणे: २ चमचे
भाजलेले शेंगदाणे: २ चमचे
मसाला डाळ किंवा चिवडा: २-३ चमचे
बारीक शेव: सजावटीसाठी
 
खास मसाला आणि तेल (हे महत्त्वाचे आहे):
मोहरीचे तेल : १ मोठा चमचा (यामुळेच अस्सल चव येते)
लिंबाचा रस: १ चमचा
चाट मसाला: १ चमचा
काळी मिरी पूड: चिमूटभर
लाल तिखट: अर्धा चमचा
मीठ: चवीनुसार (किंवा थोडे काळं मीठ)
कोथिंबीर: बारीक चिरलेली
 
बनवण्याची कृती:
एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, बटाटा, हिरवी मिरची आणि चणे एकत्र करून घ्या.
आता यामध्ये लाल तिखट, चाट मसाला, मीठ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोहरीचे तेल टाका. हे सर्व नीट मिक्स करा जेणेकरून भाज्या मसाल्यात मुरतील.
आता यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि चिवडा/डाळ मिक्स करा.
शेवटी यामध्ये कुरकुरीत चुरमुरे आणि लिंबाचा रस घाला.
झटपट चमच्याने किंवा हाताने सर्व मिश्रण एकजीव करा (खूप वेळ कालवू नका, नाहीतर चुरमुरे मऊ पडतील). वरून भरपूर कोथिंबीर आणि बारीक शेव टाका.
 
झालमुडी 'झकास' होण्यासाठी काही टिप्स:
मोहरीचे तेल: जर तुम्हाला मोहरीच्या तेलाचा तीव्र वास आवडत नसेल, तर ते थोडे गरम करून थंड करून वापरा, पण ते वापरल्याशिवाय झालमुडीला खरी चव येत नाही.
आंबटपणा: जर तुमच्याकडे लोणच्याचा मसाला (विशेषतः आंब्याच्या लोणच्याचा) असेल, तर तो अर्धा चमचा टाका. यामुळे चव कित्येक पटीने वाढते.
सर्व्हिंग: झालमुडी बनवल्या बनवल्या लगेच खावी, तरच तिचा कुरकुरीतपणा टिकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीजशिवाय पाणी थंड ठेवण्याचे रामबाण उपाय