Publish Date: Mon, 23 Sep 2024 (13:01 IST)
Updated Date: Mon, 23 Sep 2024 (13:07 IST)
साहित्य: 750 ग्रॅम भोपळा, 1/4 कप तेल, 1 टेबलस्पून आले चिरून, 1 चिमूटभर हिंग, 1 चमचा मेथीदाणा, 1 चमचा मीठ, 1/2 चमचा हळद 1/2 चमचा तिखट, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा साखर(आवडीप्रमाणे), 1 चमचा आमचूर पावडर, 4-5 तुकडे हिरव्या मिरच्या
भोपळ्याची भाजी बनवण्याची पद्धत
भोपळ्याचे दोन ते तीन सेंटीमीटर जाड तुकडे करा. कढईत तेल गरम करा. त्यात हिंग, मेथीदाणा आणि जिरे टाका. तडतडायला लागल्यावर त्यात आले घाला. आल्याचा रंग हलका झाला की त्यात हिरवी मिरची आणि भोपळा घाला, मीठ आणि साखर घाला. मंद आचेवर शिजवा. शेवटी धणेपूड, आमचूर पावडर आणि गरम मसाला घाला.