Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Leftover Roti Pakora Recipe: शिळ्या चपाती पासून बनवा चविष्ट रोटी पकोडा रेसिपी जाणून घ्या

Leftover Roti Pakora Recipe: शिळ्या चपाती पासून बनवा चविष्ट रोटी पकोडा रेसिपी जाणून घ्या
, बुधवार, 21 डिसेंबर 2022 (15:26 IST)
हिवाळा आला आहे. या हंगामात तळलेले पदार्थ आणि फराळाची मागणी वाढते. लोकांना हिवाळ्यात गरमागरम पकोडे, कचोरी, भरलेले पराठे इत्यादी खायला आवडतात. पकोड्यांमध्ये लोकांना अनेक प्रकार मिळतात. कांदे, बटाटे, कोबी आणि पालक हिवाळ्यात अधिक स्वादिष्ट लागतात. शिळ्या पोळ्या पासून पकोडे बनवू शकता चला तर मग जाणून घ्या साहित्य आणि कृती.
 
 साहित्य:
उरलेली चपाती , उकडलेले बटाटे, धणे , मीठ, लाल तिखट, हळद, हिरवी मिरची, बेसन, जिरे, बेकिंग सोडा, तेल.
 
 कृती
सर्वप्रथम उकडलेले बटाटे मॅश करा आणि त्यात धणे , मीठ, लाल तिखट आणि हिरव्या मिरच्या घाला.
आता एका भांड्यात बेसनाचे पीठ तयार करा, त्यात लाल तिखट, मीठ, हळद, जिरे, हिरवी मिरची टाका आणि पाणी घालून घोळ बनवा.
 
 या घोळमध्ये बेकिंग सोडा मिसळा आणि थोडा वेळ ठेवा. लक्षात ठेवा की घोळ खूप घट्ट किंवा पातळ नसावे.
आता मॅश बटाट्याचे मिश्रण रोटीवर पसरवा. नंतर चपातीचे रोल बनवा. रोलचे दोन किंवा तीन तुकडे करा.
कढईत तेल गरम करा.
 तेल गरम झाल्यावर रोटी रोल बेसनच्या मध्ये बुडवून पॅनमध्ये ठेवा.
आता रोटी तळून घ्या. सोनेरी होईपर्यंत तळल्यावर गरमागरम रोटी पकोडे सर्व्ह करा.
 
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

vakrasana benefits :वक्रासन योग करण्याचे फायदे