Publish Date: Tue, 06 Aug 2024 (06:36 IST)
Updated Date: Mon, 05 Aug 2024 (16:26 IST)
दिवस मावळल्यानंतर प्रत्येक महिलेला रात्री जेवण काय बनवावे याची काळजी लागून राहते. तसेच कुटुंबातील सदस्य देखील विचारतात आज काय नवीन बनवणार. याकरिता आज आपण पाहणार आहोत अशी डिश जी नाश्ता, लंच, डिनर करीत तुम्ही बनवू शकतात. सोप्पी आणि लज्जतदार अशी अमृतसरी पनीर भुर्जी बनवून पहा. तर चला लिहून ह्या रेसिपी.
साहित्य-
लोणी
तेल
बटाटा
टोमॅटो
हिरवी मिरची
आले
मीठ
हळद
काश्मिरी लाल मिरची
गरम मसाला
कस्तुरी मेथी
मलई
कृती-
एका पॅनमध्ये लोणी आणि तेल घालावे. यानंतर यामध्ये एक चमचा बेसन घालून चांगल्याप्रकारे मिक्स करून भाजून घ्या. यानंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आले घालून शिजवून घ्यावे. नंतर या मध्ये मीठ, हळद, कश्मीरी लाल मिरची आणि गरम मसाला घालावा. 2-3 मिनिट पर्यंत शिजवावे. तसेच गरजेनुसार गरम पाणी घालावे. आता यामध्ये कसूरी मेथी आणि क्रीम घालून काही मिनिट शिजवावे. तर चला तयार आहे आपली अमृतसरी पनीर भुर्जी रेसिपी. तुम्ही पराठ्यांसोबत देखील सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik