Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चविष्ट व्हेज मोमोज घरच्या घरी बनवा, जाणून घ्या रेसिपी

चविष्ट व्हेज मोमोज घरच्या घरी बनवा, जाणून घ्या रेसिपी
, सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (22:12 IST)
मोमोज खाण्याचे शौकीन असल्यास आता आपण घरी देखील चविष्ट व्हेज मोमोज  बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी.  
 
मिक्स व्हेज मोमोज बनवण्यासाठी साहित्य - 
मैदा - 3/4 कप
- सोया - 1 कप
- तेल - 2 टीस्पून
- मीठ - चवीनुसार
- लसूण - 1 टीस्पून
- आले - 1 टीस्पून
- कांदा - 1/2 चिरलेला
- बीन्स - 1 /4 कप
- गाजर - 1/4 कप
- काळी मिरी पावडर - 1/2 टीस्पून
- चिली सॉस - 1/2 टीस्पून
- कोबी - 1 टीस्पून
- मिर्च पावडर - 1/2 टीस्पून
- सोया सॉस - 1 टीस्पून
- व्हिनेगर -1 टीस्पून
 
मिक्स व्हेज मोमोज बनवण्याची पद्धत- मिक्स व्हेज मोमोज बनवण्यासाठी 
सर्वप्रथम मैद्यामध्ये एक चमचा तेल, मीठ, व्हिनेगर आणि पाणी घालून मळून घ्या आणि सेट होण्यासाठी बाजूला ठेवा. यानंतर कढईत एक चमचा तेल गरम करून त्यात आले, लसूण आणि कांदा घालून चांगले परतून घ्या. आता त्यात चिली सॉस, सोया सॉस, मिरपूड आणि मीठ घालून आणखी काही वेळ परतून घ्या. थोड्या वेळाने हिरव्या भाज्या घालून परतून घ्या. आता मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून लाटून घ्या. या गोळ्यांमध्ये तयार मसाला भरून मोमोजच्या आकारात बनवा. आता 5-10 मिनिटे वाफेवर शिजवा. टेस्टी मिक्स व्हेज मोमोज खाण्यासाठी तयार आहेत. गरमागरम सर्व्ह करा. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Indian Navy Recruitment 2022: भारतीय नौदलात हजाराहून अधिक पदांसाठी भरती, अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या