Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बदलत्या हंगामात बनवा शाकाहारी चविष्ट टोमॅटो आमलेट

webdunia
शुक्रवार, 18 जून 2021 (21:14 IST)
पावसाळा आला की काही तरी चमचमीत खावंसं वाटतं.अशा परिस्थितीत संध्याकाळच्या चहा बरोबर आपण टोमॅटो पासून बनविलेले शाकाहारी ऑमलेट देखील बनवू  शकता.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य- 
1 कप हरभराडाळीचे पीठ, 1 टोमॅटो बारीक चिरलेला,1 कांदा चिरलेला , आलं हिरव्यामिरचीची पेस्ट,1 चमचा हळद,1 चमचा तिखट,1 चमचा गरम मसाला,हिंग चिमूटभर,मीठ चवीप्रमाणे,तेल कोथिंबीर.
 
कृती -
एका मोठ्या वाडग्यात हरभराडाळीचे पीठ,टोमॅटो,कांदा,आलं हिरव्या मिरचीची पेस्ट,हळद,गरम मसाला,लाल तिखट,हळद,मीठ,हिंग,आणि थोडं तेल घालून चांगल्या प्रकारे फेणून घ्या.या मध्ये दीड कप पाणी घाला आणि घोळ तयार करा.कोथिंबीर बारीक चिरून घाला. गॅस वर तवा तापत ठेवा आणि तवा तापल्यावर थोडं तेल त्यावर घाला आणि तयार घोळ एका चमच्याने घालून पसरवून द्या.मध्यम आचेवर दोन्ही कडून शेकून घ्या. तांबूस रंगांचे डाग पडल्यावर हे तयार  गरमा गरम टोमॅटो ऑमलेट हिरव्या चटणीसह सर्व्ह करा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Father's Day 2021 विशेष:या तीन गोष्टी लक्षात ठेवा ,वडिलांशी नातं दृढ होईल.