हिवाळ्यात वाटाणे खूप चवदार दिसतात. म्हणूनच आपण मटर पुलाव, मटर चाट, मटर स्नॅक्स, मटर कबाब, मटर सब्जी इत्यादी बनवतो आणि खातो.मटारचा पराठा बनवणे खूप सोपे आहे. तुम्ही चहासोबत गरमागरम सर्व्ह करू शकता. मुलांसाठी हा खूप चांगला नाश्ता आहे. चला साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य
2कप- गव्हाचे पीठ
4-5 - वाटी उकडलेले मटार
1/4 टीस्पून- जिरे
1/4 - वाटी कोथिंबीर
1/2 टीस्पून -लाल तिखट
मीठ - चवीनुसार
तेल किंवा तूप - आवश्यकतेनुसार
पाणी - आवश्यकतेनुसार
1/2 टीस्पून -कसुरी मेथी
कृती -
मटार सोलून मीठ आणि पाणी घालून उकळवून घ्या. नंतर मटार उकडल्यावर एका भांड्यात काढून मॅश करा. मॅश केल्यावर त्यात मीठ, हिरवी कोथिंबीर घालून मिसळा.
आता एका भांड्यात गव्हाचं पीठ मळून घ्या. आता कणकेचे गोळे तयार करून त्यात मटारचे फिलिंग भरून घ्या आणि पोळी प्रमाणे लाटून घ्या.
आता गॅस वर तवा तापायला ठेवा आणि तेल किंवा तूप लावून पराठे सोनेरी होई पर्यंत भाजून घ्या. दोन्ही बाजूने चांगले शेकून गरम पराठे सर्व्ह करा.