साहित्य -
500 ग्रॅम मेथी दाणा, 100 ग्रॅम खाण्याचे डिंक बारीक केलेले, 500 ग्रॅम गव्हाचे जाडसर पीठ, 1 किलो गूळ, 250 ग्रॅम पिठी साखर, 100 ग्रॅम बारीक चाळलेली सुंठपूड, 1 किलो साजूक तूप, 100 ग्रॅम खसखस, 250 ग्रॅम बारीक कापलेले सुकेमेवे, 10 ग्रॅम वेलची पूड.
कृती -
मेथीदाण्याला स्वच्छ करून दोन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. हे पाणी बदलून घ्या. ताज्या पाण्याने स्वच्छ धुऊन बारीक दळून घ्या. जाड तळ असलेल्या पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घालून मंद गॅसवर परतून घ्या. लागत लागत तूप घाला. तपकिरी रंग आणि सुवास येई पर्यंत परतून घ्या. आता गव्हाच्या पिठाला देखील अशा प्रकारे परतून घ्या.
डिंकाला देखील तुपात घालून तळून घ्या. कुस्करून घ्या. थोड्याच तुपात सुंठ आणि खसखस घालून काढून घ्या. आता गुळाला देखील तुपात घालून परतून घ्या. चांगल्या प्रकारे तूप गूळ मिसळल्यावर खाली काढून घ्या. या मध्ये तयार केलेले सर्व जिन्नस,सुकेमेवे वेलची पूड, पिठी साखर मिसळून द्या. तूप कमी असल्यास यामध्ये गरम तूप मिसळा. या सर्व मिश्रणाला गरम असताना चोळून घ्या आणि लाडू करा.
हिवाळ्यात सकाळी न्याहारीत हे लाडू खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा मिळते. कंबर दुखी, सांधेदुखी आणि संधिवाताच्या आजारांपासून आराम मिळतो.