Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेंगदाणे आणि दह्याची चटणी

Curd
, गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (08:39 IST)
शेंगदाणे हे आरोग्यासाठी आरोग्यदायी मानले जाते. अशा परिस्थितीत ज्या लोकांना शेंगदाणे आवडत नाही, ते त्यापासून बनवलेली शेंगदाण्याची दही चटणी खाऊ शकतात.
 
आवश्यक वस्तू- 
भाजलेले शेंगदाणे - अर्धा कप, 
दही - अर्धा कप, 
हिरवी मिरची - दोन किंवा चवीनुसार, 
जिरे - अर्धा टीस्पून,
तूप - एक टेस्पून,
साखर आणि मीठ - चवीप्रमाणे.
 
कसे बनवावे
सर्व प्रथम भाजलेले व सोललेले शेंगदाणे, अर्धा टीस्पून जिरे, साखर, मीठ आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये टाकून चांगले बारीक करून घ्या. आता त्यात दही घाला आणि सर्वकाही पुन्हा बारीक करा.आता पुन्हा सोललेल्या शेंगदाण्यांसोबत थोडेसे पाणी घालून मिक्सर पुन्हा फिरवा.
 
आता कढईत तूप गरम करा. गरम तुपात जिरे टाका. त्यात दह्याची पेस्ट घाला. आता ही चटणी मंद आचेवर उकळी येईपर्यंत शिजवा. तुमची शेंगदाण्याची दही चटणी तयार आहे. शेंगदाण्याची दही चटणी गरम पराठ्यासोबत सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Remedies to control diabetes at home साखरेची पातळी कमी करण्यासाठी घरगुती उपाय