Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 25 April 2025
webdunia

पिझ्झा समोसा रेसिपी

पिझ्झा समोसा रेसिपी
, बुधवार, 5 फेब्रुवारी 2025 (08:00 IST)
साहित्य-
समोसा पट्टी - 10
तेल  
शिमला मिरची - एक बारीक चिरलेली
टोमॅटो - एक बारीक चिरलेला
हिरवी मिरची - एक बारीक चिरलेली
मोझरेला चीज - अर्धा कप किसलेले
टोमॅटो सॉस - दोन चमचे
ओरेगॅनो - अर्धा टीस्पून
चिली फ्लेक्स - अर्धा टीस्पून चवीनुसार
काळी मिरी पूड - अर्धा टीस्पून
चवीनुसार मीठ
ALSO READ: Breakfast recipe : रवा आप्पे
कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा आणि त्यात चिरलेली शिमला मिरची, हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो घालावा. तसेच दोन मिनिटे परतून घ्या. आता टोमॅटो सॉस, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. हे मिश्रण दोन मिनिटे शिजवा आता गॅस बंद करा आणि थोडे थंड होऊ द्या. आता किसलेले मोझरेला चीज घालावे आणि चांगले मिसळा. आता समोशाची पट्टी घ्या आणि त्यांना अर्धे घडी करून त्रिकोणी आकार द्या. तसेच आता त्यात तयार केलेले पिझ्झाचे मिश्रण भरा. नंतर समोसा दोन्ही बाजूंनी दाबून व्यवस्थित बंद करा. आता एका पॅनमध्ये तेल गरम करा. आता समोसे घाला आणि मध्यम आचेवर सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. तळलेले समोसे टिश्यू पेपरवर काढावे. तर चला तयार आहे आपली पिझ्झा समोसा रेसिपी, चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अकबर-बिरबलची कहाणी : जेव्हा बिरबल लहान झाला