आरोग्यदायी भोपळा-पनीर पराठा रेसिपी
, शनिवार, 4 जानेवारी 2025 (08:00 IST)
साहित्य-
एक कप पीठ
अर्धा भोपळा (वाफवलेला)
चवीनुसार मीठ
एक चमचा तूप
एक चमचा कोथिंबीर
एक टीस्पून चिरलेला कांदा
1/4 टीस्पून गरम मसाला
एक टेबलस्पून पांढरे तीळ
आवश्यकतेनुसार पाणी
कृती-
सर्वात आधी एक मोठ्या बाऊलमध्ये मीठ आणि थोडे तूप घालून पीठ मळून घ्यावे. आणि थोडा वेळ बाजूला ठेवा. नंतर भोपळा सोलून वाफवून घ्यावा. वाफवलेल्या भोपळ्यामध्ये पनीर, बारीक चिरलेला कांदा, गरम मसाला, मीठ आणि हिरवी कोथिंबीर घालून नीट मॅश करून सारण तयार करावे. आता मळलेल्या पिठाचे गोळे बनवून प्रत्येक गोळ्यांमध्ये तयार केलेले सारण भरावे. नंतर काळजीपूर्वक रोल करा आणि पराठ्याचा आकार द्यावा. पराठ्यावर थोडे पांढरे तीळ शिंपडा आणि तव्यावर तूप लावून दोन्ही बाजूंनी चांगले शिजवून घ्यावा. तर चला तयार आहे आपला भोपळा पनीर पराठा रेसिपी, सॉस किंवा हिरवी चटणीसोबत गरम नक्की सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख