Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लो कॅलोरी मटार कचोरी

लो कॅलोरी मटार कचोरी

सौ. चित्रा काळे

साहित्य: 2 वाटी गव्हाचा आटा, 2 वाटी मटार, 4 उकळलेले बटाटे, 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या कळ्या, चार हिरव्या मिरच्या, 1-1 चमचा धणष व शोफ (दरदरेली कुटलेली), 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ, बारिक चिरलेली कोथिंबीर आणि तेल.
 
कृती: सर्वप्रथम आट्यामधे चवीनुसार मीठ आणि मग तेलाचे मोहन टाकून (मुठ वळेल इतके मोहन टाकायचे) मिळवून घ्यावे. आटा घट्ट भिजवून झाकून ठेवावे. मटार उकळत्या पाण्यात शिजवून पाणी गाळून घ्यावे. मिरजी, आलं, लसणाची पेस्ट थोड्याश्या तेलात परतून घ्यावी. बटाटे व मटर कुसकरून त्यात परतलेली पेस्ट व इतर सर्व मसाले टाकून लाडवा येवढे गोळे तयार करून घ्यावे. आटाच्या पुरीत भरून कचोरी तयार करावी. एका फ्रांइग पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून कचोर्‍या ठेवून वरतून थोडे-थोडे तेल सोडायचे. मग झाकण ठेवून कचोर्‍यांना दोन्हीकडून वाफवून घ्याव्या. लालसर झाल्या की हिरवी आणि चिंचेच्या चटणीसोबत गरम गरम खाव्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बहुगुणी आवळा