साहित्य :- पाव किलो लाल ओल्या मिरच्या (वाळलेल्या लाल मिरच्या घेऊन एक तास भिजवून देखील घेता येतं), एक कुडी लसूण, मीठ, एक चमचा धणे पूड, एक चमचा जिरे पूड, एक मोठा चमचा तेल, मीठ चवीप्रमाणे, एक चमचा लिंबाचा रस.
कृती :- प्रथम मिरच्यांचे देठ काढून स्वच्छ धुऊन घ्यावा. मीठ आणि लसणासोबत मिक्सरमधे वाटाव्या. नंतर तेल गरम करुन हे मिश्रण, जिरेपूड, धणेपूड घालून मंद आचेवर किमान 2-3 मिनिट परतून घ्यावा. शेवटी लिंबचा रस घालून मिसळून घ्यावा.
लाल मिरचीचा चमचमीत ठेचा पोळी, पराठा, पुरी, वरण-भात अगदी कोणत्याही पदार्थांसोबत चविष्ट लागतो.