Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रात्रीचं वरण उरलं असेल तर तयार करा चविष्ट सांबार पराठा

रात्रीचं वरण उरलं असेल तर तयार करा चविष्ट सांबार पराठा
, गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (18:07 IST)
सकाळी न्याहारीत काही चविष्ट आणि पौष्टिक बनवून खायची इच्छा होते पण काय बनवायचे हे कळतच नाही. कारण वेळेचा अभाव असतो आणि काही तरी चटकन करायचे असतं. आणि मुलांना देखील आवडेल आणि ते सहज खाण्यास तयार होतील असा पदार्थ सुचणे अवघड असतं. अशात चविष्ट पराठा तयार होऊ शकतो. सांबार पराठा हा त्यावरील उपाय आहे. याची सामुग्री घरी सहजपणे मिळते आणि हे पराठे लवकर बनतात. तसेच बऱ्याच वेळा घरात वरण उरल्यावर ते कसं संपवावा हा प्रश्न असतो. शिल्लक असलेल्या वरणा पासून देखील बनविता येईल. चला तर मग सांबार पराठा कसा बनवायचा जाणून घ्या-
 
साहित्य: 
सांबार पराठा बनविण्यासाठी फारच कमी साहित्याची गरज असते. आपण आपल्या गरजेनुसार भाज्यांची वाढ करू शकता. किंवा भाज्या नसल्यास तरी हरकत नाही. सांबार डाळ, गव्हाचं पीठ - दोन कप, मीठ चवीपुरती, तूप, गाजर, पालक.

सांबार पराठा बनविण्याची कृती : 
सांबार पराठा बनविण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचं पीठ घ्या. आता यामध्ये उरलेले सांबार किंवा वरण टाका. साधं वरण असल्यास त्या सांबार मसाला टाकता येईल. चव वाढेल. चवीप्रमाणे मीठ घाला. या पिठाला मऊसर मळून घ्या. मऊ मळल्यावर काही मिनिटांसाठी बाजूस ठेवा. 
 
आता या कणकेच्या लहान लहान गोळ्या करून कोरडे पीठ लावून लाटून घ्या. नंतर या वर तूप लावून घडी पाडा. आता याला त्रिकोणी आकार द्या. या त्रिकोणी पराठ्यावर कोरडे पीठ लावून लाटून घ्या. जेणे करून याचा त्रिकोणी आकार वाढेल. आता तापलेल्या तव्यावर तूप लावून सोनेरी रंग येई पर्यंत दोन्ही बाजूने शेकावे. 
 
आपण इच्छित असल्यास याला लच्छा पराठ्याचा आकार देऊन देखील लाटू शकता. हे खाण्यासाठी चविष्ट असणार. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुली अशा प्रकारे करतात फ्लर्ट...