Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Soya chaap Recipe: स्वादिष्ट तंदुरी सोया चाप घरीच बनवा, जाणून घ्या रेसिपी

Soya chaap Recipe:  स्वादिष्ट तंदुरी सोया चाप घरीच बनवा, जाणून घ्या रेसिपी
, शनिवार, 3 जून 2023 (17:56 IST)
तंदूरी सोया चाप तुम्ही बाजाराप्रमाणे घरी सहज बनवू शकता.  घरी तंदुरी सोया चाप बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया
साहित्य: 
250 ग्राम सोया चाप, 3 चमचे दही, 1 टीस्पून बेसन, 1 टीस्पून मिरची पावडर, 1/2 टीस्पून जिरेपूड, 1/2 टीस्पून धने पावडर, 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून टीस्पून काळी मिरी पावडर, 1 टीस्पून तंदूरी मसाला पावडर, 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर, 1/2 टीस्पून आले लसूण पेस्ट, 3 टेबलस्पून बटर,2 टीस्पून लिंबाचा रस, चाट मसाला 2 टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ
 
कृती- 
सोया चापचे लहान तुकडे करा.आता दह्यातील सर्व पाणी पिळून घ्या आणि सोया चापमध्ये दही मिसळा. नंतर त्यात बेसन, लाल तिखट, जिरेपूड, हळद, धनेपूड, तंदुरी मसाला पावडर, गरम मसाला, चाट मसाला, आले लसूण पेस्ट आणि 1 चमचा तेल घालून मिक्स करा.सोया चॅप 20-30 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा.पॅनमध्ये बटर किंवा हलके तेल गरम करा. त्यात कांदा टाका आणि 5-7 मिनिटे शिजवा. तुकडे सतत वळवत राहा,भाजण्यापूर्वी,चापच्या तुकड्यांना थोडेसे लोणी लावा. दोन मिनिटे शिजवल्यानंतर तुमचा तंदूरी सोया चाप तयार आहे. त्यात चाट मसाला आणि लिंबू पिळून सर्व्ह करा.
 
Edited by - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Career After 10th : 10वी नंतर कोणता कोर्स करायचा आहे, संपूर्ण यादी पहा