suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उन्हाळ्याच्या दिवसात; चमचमीत जेवणासोबत लसूण-पुदिन्याचे थंडगार रायता नक्की ट्राय करा

Cold garlic-mint raita
उन्हाळ्याच्या दिवसात किंवा चमचमीत जेवणासोबत लसूण-पुदिना रायता अतिशय थंडगार आणि पाचक ठरतो. लसणामुळे याला एक वेगळीच चव येते. चला तर हा रायता बनवण्याची सोपी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. 

साहित-
घट्ट दही: २ कप (चांगले फेटलेले)
ताजी पुदिना पाने: १/२ कप
लसूण पाकळ्या: ४ ते ५ (छोट्या असल्यास ६-७)
हिरवी मिरची: १ (बारीक चिरलेली किंवा वाटलेली)
भाजलेली जिरे पूड: १ छोटा चमचा
काळं मीठ: १/२ छोटा चमचा
साधे मीठ: चवीनुसार
लाल तिखट: चिमूटभर (सजावटीसाठी)
ALSO READ: आरोग्यासाठी अत्यंत पोषक असा पदार्थ; डाळिंबाचा रायता पटकन लिहून घ्या रेसिपी
कृती-
सर्वात आधी पुदिना पाने, लसूण आणि हिरवी मिरची एकत्र करून खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. (लसूण कच्चा वापरल्यामुळे उग्र वास येतो, जर तुम्हाला तो आवडत नसेल तर लसूण थोडा तेलावर परतून घेऊ शकता). आता एका मोठ्या बाऊलमध्ये दही घेऊन ते रवीने किंवा विस्करने छान एकजीव करून घ्या. दही खूप घट्ट वाटल्यास थोडे पाणी किंवा दूध घालू शकता. फेटलेल्या दह्यात तयार केलेली पुदिना-लसूण पेस्ट, भाजलेली जिरे पूड, काळं मीठ आणि साधे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. रायत्यावर वरून थोडी जिरे पूड आणि सजावटीसाठी बारीक चिरलेला पुदिना किंवा चिमूटभर लाल तिखट भुरभुरा, तर चला तयार आहे आपले  लसूण-पुदिन्याचे थंडगार रायता, जेवणासोबत नक्कीच ट्राय करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Guava Raita चविष्ट, चटपटीत आणि पचनासाठी हलकी डिश पेरूचा रायता


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Marathi Rajbhasha Din 2026 Wishes in Marahti मराठी राजभाषा दिन शुभेच्छा