Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 9 April 2025
webdunia

Summer Special Recipe टरबूज आईस्क्रीम

Watermelon Ice Cream
, गुरूवार, 3 एप्रिल 2025 (08:00 IST)
साहित्य-
गोड टरबूज- एक
दूध-५०० ग्रॅम
खवा- एक कप
कॉर्नफ्लोअर-दोन चमचे  
व्हॅनिला इसेन्स
साखर-एक कप
काजू बारीक चिरलेले
ALSO READ: केळीचे चॉकलेट आईस्क्रीम रेसिपी
कृती-
सर्वात आधी एक गोड टरबूज घ्या, टरबूज कापून त्यातील बी काढून घ्यावे तसेच त्याचा हिरवा भाग देखील काढून घ्यावा. आता त्याचे तुकडे करावे. व हे तुकडे मिक्सरमधून बारीक करून घ्या. ते एका भांड्यात काढा आणि ते भांडे फ्रीजमध्ये ठेवा. आतादुधाच्या अर्ध्या भागामध्ये  कॉर्नफ्लोअर घाला आणि ते चांगले मिसळा. उरलेले अर्धे दूध एका पॅनमध्ये ठेवा आणि मध्यम आचेवर पाच मिनिटे शिजवा. दूध पाच मिनिटे शिजल्यावर त्यात कॉर्नफ्लोअर मिसळलेले दूध घाला आणि आणखी पाच मिनिटे शिजवा. आता  त्यात मावा मिसळा आणि मंद आचेवर एक मिनिट शिजवा आणि चांगले मिसळा जेणेकरून एकही गाठ राहणार नाही. आता बारीक चिरलेले काजू, साखर आणि व्हॅनिला एसेन्स घाला आणि चांगले मिसळा म्हणजे साखर चांगली विरघळेल. साखर विरघळली की थंड होऊ द्या. आता टरबूज बाहेर काढा आणि त्यात मिसळा. कमीत कमी चार ते पाच मिनिटे चांगले मिसळा. आता संपूर्ण मिश्रण एका हवाबंद डब्यात ओता आणि झाकण बंद करा आणि ते सेट होण्यासाठी सात तास फ्रीजमध्ये ठेवा.  टरबूजचे आइस्क्रीम सेट होईल, आता त्यावर बदाम सजवा, तर चला तयार आहे आपले टरबूज आईस्क्रीम रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: तुळशीचे आईस्क्रीम जाणून घ्या रेसिपी
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लघू कथा : राणी मुंगीची शक्ती