Publish Date: Sun, 24 Aug 2025 (08:00 IST)
Updated Date: Sat, 23 Aug 2025 (22:17 IST)
साहित्य-
दुधी भोपळा -एक
उकडलेले बटाटे- दोन
धणे-एक टीस्पून
लाल मिरची-एक टीस्पून
गरम मसाला- एक टीस्पून
कोथिंबीर
मीठ- चवीनुसार
जिरेपूड- एक टीस्पून
ब्रेड स्लाइस -दोन काप
कृती-
सर्वात आधी दुधी सोलून किसून घ्यावा लागेल. आता दुधीचा सर्व रस काढावा. मग त्यात बटाटे मॅश करावे. यानंतर लाल मिरची, जिरेपूड, गरम मसाला, धणे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ असे आवश्यक मसाले मिसळावे.यात ब्रेड ओला करून मिक्स करावे. नंतर आप्पेचे छोटे गोळे बनवावे.यानंतर, आप्पे पॅनमध्ये तेल ग्रीस करावे. मग हे गोळे आप्पे पॅनमध्ये ठेवावे आणि मंद आचेवर शिजवावे. तर चला तयार आहे रविवार स्पेशल नाश्ता दुधी भोपळ्याचे आप्पे रेसिपी सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik