Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लसूणी मुगाची डाळ : मायक्रोवेव्हमधील

लसूणी मुगाची डाळ : मायक्रोवेव्हमधील

वेबदुनिया

साहित्य  - १ वाटी हिरवी मूगडाळ, ५-६ लवंगा, मीठ, लाल तिखट, कढीपत्त्याची पानं, हळद, २ टे.स्पू. तेल, लसूण, हिंग, जिरा, चिरलेली कोथिंबीर.

कृती - डाळ धुवून अर्धा तास भिजत ठेवा, डाळ मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये टाका. त्यात शिजणेपुरते पाणी- मीठ- हळद-टाकून त्यावर झाकण ठेवून मायक्रोवेव्हमध्ये हायवर (१00%) १0 मिनिटे ठेवा. दुसर्‍या बाऊलमध्ये तेल, लसणाचे काप, कढीपत्त्याची पानं, जिरे, हिंग, लवंगा, लाल मिरची टाकून झाकण न ठेवता हायवर (१00%) ३0 सेकंद ठेवा. नंतर यात शिजलेली मुगाची डाळ टाकून मायक्रोवेव्हमध्ये हायवर झाकण न ठेवता २ मिनिटं ठेवा. बाहेर काढून त्यावर कोथिंबीर पेरा.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बरस रे घना...