घरात काही खाण्याची इच्छा असल्यास क्रिस्पी व्हेज रवा इडली सर्वात उत्तम खाद्य आहे.हे खाण्यात चविष्ट, रुचकर आणि सहजपणे पचणारी रेसिपी आहे. चला तर मग जाणून घेऊ या साहित्य आणि कृती.
साहित्य -
2 कप रवा, 2 कप दही, 1/2 कप फ्लॉवर बारीक चिरलेली, 1/4 कप मटार दाणे, 1-2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 चमचा आलं किसलेलं, 1 लहान चमचा उडीद डाळ, 1/2 लहान चमचा मोहरी, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 2-3 चमचे तेल, 1 लहान चमचा बेकिंग सोडा, मीठ चवीप्रमाणे.
कृती -
सर्वप्रथम एका भांड्यात दह्याला चांगल्या प्रकारे फेणून घ्या त्या मध्ये रवा घालून मिसळा. घोळ जास्त घट्ट असेल तर 2 ते 3 चमचे पाणी घाला. या घोळात मीठ, चिरलेल्या भाज्या, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर मिसळा. आता एका लहान पॅन मध्ये एका चमचा तेल घालून गरम करा मोहरी घाला मोहरी फुटल्यावर उडीद डाळ घालून सोनेरी रंग येई पर्यंत परतून घ्या. हे सर्व साहित्य इडलीच्या घोळात मिसळून घ्या आणि या मिश्रणाला 15 मिनिटे तसेच ठेवा.
कुकर मध्ये 2 ग्लास पाणी घालून गॅस वर ठेवा इडलीच्या पात्राला तेल लावून ठेवा. 15 मिनिटे झाल्यावर घोळात बेकिंग सोडा घालून चांगल्या प्रकारे फेणून घ्या. बबल आल्यावर फेणणे बंद करा. आता मिश्रण चमच्याच्या साहाय्याने इडलीच्या पात्रात प्रत्येक कप्प्यात भरा. इडली पात्र कुकर मध्ये ठेवा. कुकरच्या झाकण्यावरील शिटी काढून घ्या आणि कुकर बंद करा. इडली 10 -15 मिनिटे शिजवा. नंतर बाहेर काढून इडली सुरीच्या साहाय्याने काढून घ्या. खाण्यासाठी व्हेज इडली तयार आहे. नारळाच्या चटणीसह किंवा शेंगदाण्याच्या चटणीसह सर्व्ह करा.