चटपटीत शिंगाड्याचे लोणचे रेसिपी
, गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024 (20:01 IST)
साहित्य-
ताजे शिंगाडे
मोहरीचे तेल
मेथी दाणे
मोहरी
हळद
तिखट
मीठ
व्हिनेगर
कृती-
सर्वात आधी शिंगाडे स्वच्छ धुवून घ्यावे. यानंतर, त्यांना उकळवून त्यांची साले काढून घ्यावी. आता त्यांचे लहान तुकडे करून घ्यावे. आता एका पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करावे. तेल थोडे गरम झाले की मेथी दाणे आणि मोहरी घालावी. हे मसाले मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यावे. यानंतर त्यात हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. आता या मसाल्यात शिंगाडे तुकडे घालावे आणि हलक्या हाताने मिक्स करावे. त्यांना मंद आचेवर २ मिनिटे शिजू द्यावे. आता या लोणच्यामध्ये थोडे व्हिनेगर घाला. यामुळे लोणचे केवळ दीर्घकाळ टिकत नाही तर त्याला आंबटचवही मिळते. लोणचे थंड होऊ दयावे आणि नंतर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरा. 2 दिवस उन्हात ठेवावे म्हणजे मसाले चांगले मिसळतात व लोणचे छान चटपटीत लागते. तर चला तयार आहे आपले चटपटीत शिंगाडयाचे लोणचे रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख