उपमा
झटपट बनणारा सकाळचा नाश्ता
साहित्य : 250 ग्रॅम रवा, तेल, शेंगदाणे 50 ग्रॅम, खोबरे 50 ग्रॅम, दहा हिरव्या मिरच्या, दोन मोठे कांदे, जीरे, मीरे, मोहरी
कृती : गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालावे. तेल गरम होऊ द्यावे. गरम तेलात कांदा टाकून तांबूस होईपर्यंत तळावे. जीरे, मीरे, मोहरी टाकून भाजून घ्यावे. शेंगदाणे, खोबरे टाकून परतावे.
हिरव्या मिरच्याही तेलात तळून घ्याव्यात. संपूर्ण मिश्रण चांगले तयार झाल्यावर रवा कढईत घालून सपाट चमच्याने परतण्यास सुरवात करावी. साधारणतः वीस मिनिटांपर्यत रवा भाजावा.
रव्यास तांबूस होईपर्यंत भाजत रहावे. रव्याचा सुगंध दरवळू लागल्यानंतर रवा भाजून पूर्ण झाल्याचे समजावे. एका पातेल्यात अडीच ग्लास पाणी तापवायला ठेवावे.
रवा भाजला गेल्यानंतर त्यात पाणी घालून मिश्रण चमच्याने पाच मिनिटांपर्यंत परतावे. अशाप्रकारे चविष्ट उपमा तयार! उपमा डिशमध्ये सर्व्ह करून त्यावर खोबर्याचा कीस भुरभुरावा.