Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%b3 110112200012_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कांद्याचे कुवळ

कांद्याचे कुवळ
MHNEWS
साहित्य : दोन भाजलेले कांदे, दोन कच्चे कांदे, प्रत्येकी दोन किंवा तीन लवंग, मिरे, दालचिनी, अर्धी वाटी चिंचेचा कोळ, दीड वाटी नारळाचे दूध, चवीनुसार मीठ व लाल मिरच्या.

फोडणीसाठी : तेल, जिरे, हिंग, हळद, मोहरी.

कृती : दोन कच्चे आणि दोन भाजलेले कांदे सोलून, जाडसर चिरून मिक्सरवर बारीक वाटावे. लवंग, दालचिनी, मिरे तेलात परतून वाटावे. लाल मिरची घालून तेलाची फोडणी करावी. त्यामध्ये सर्व वाटण छान परतावे. परतल्यावर त्यात चिंचेचा कोळ, नारळाचे दूध घालावे. मीठ घालून उकळावे.

भाताबरोबर खायला कुवळ खूपच छान वाटते. चपाती किंवा भाकरी सोबतही खायला हरकत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi