Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%a8 %e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be 113112100016_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किचन मंत्रा

किचन मंत्रा
WD
- टोमॅटो कापताना सुरीला किंवा विळीला तेल लावल्यावर भराभर कापला जातो. बारीक फोडी हव्या असतील तर आतील बाजूने कापावा.

- सॅलेडच्या भाज्या चिरताना बर्फाच्या पाण्यात घालून ठेवा म्हणजे भाज्या ताज्या राहतील.

- उकडलेले बटाटे सोलताना सालासकट त्याचे चार तुकडे सुरीने करा. घाईच्या वेळेस बटाटे लवकर थंड होऊन सोलले जातील.

- अळूची पातळ भाजी करताना पानांचे तुकडे करुन मिक्सरमध्ये फिरवून घ्यावेत म्हणजे भाजी चांगली होते.

- व्हेजिटेबल सूप उकळताना चमचाभर मिल्क पावडर सुपात घातल्यास मळी दूर होऊन, स्वच्छ नितळ सूप तयार होते.

- कोबीची भाजी करताना, चिरुन झाल्यावर धुऊन मीठ लावून ठेवावे. त्यामुळे कोबी चटकन शिजतो व उग्र वास येत नाही.

- गाजराच्या कोशिंबिरीत दोन-तीन कुटाच्या मिरच्या तळून चुरा करुन घालाव्यात. कोशिंबिरीची लज्जत वाढते.

- हरभरा सोलण्याचे काम चटकन उरकण्यासाठी निर्लेप कात्रीने हरभरा दोन्हीकडून थोडा थोडा छाटावा. दाणा चटकन बाहेर पडतो.

- अळूची पाने खाजरी असतील तर प्रथम ती पाने धुवावीत नंतर एका पसरट भांडय़ात पाणी घेऊन त्यात लिंबू पिळावे. 10-15 मिनिटे तसेच ठेवावे. अळूची पाने चाळणीत निथळून घ्यावीत म्हणजे खाज कमी होईल.

विधिषा देशपांडे

Share this Story:

Follow Webdunia marathi