लागणारे जिन्नस:
एक पाव कैरी, 1/2 वाटी कापलेली हिरवी मिरची, 1 चमचा जिरे, 1 लिंबू, 1 चमचा लाल तिखट, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ.
तयार करावयाची कृती:
कैरी धुऊन कापून घ्या. वरील सर्व साहित्य तसेच लिंबूचा रस टाकून मिक्सरमधून वाटून घ्या. आवश्यक तेवढे पाणी टाका. त्यामुळे घट्ट आणि स्वादिष्ट चटणी तयार होईल.
हि चटणी गरमा-गरम भजी, वडे किंवा ब्रेडला लावून सर्व्ह करा.