साहित्य : ताज्या कोथिंबिरीची एक मोठी जुडी, चार ते पाच ओल्या मिरच्या, चार-पाच खारका, अडीच ते तीन इंच लांबीचा आल्याचा जाड तुकडा, मोठ्या लिंबाएवढा गूळ, दोन मध्यम आकाराची लिंबे, पाव चमचा मेथ्या, मीठ, फोडणीचे साहित्य.
कृती : आले धुऊन, बारीक बारीक फोडी करून घ्याव्या. खारका धुऊन, फोडून त्यांचे उभे तुकडे करावे. कोथिंबीर नीट करून, धुऊन सुकत ठेवावी, कोरडी झाल्यावर बारीक चिरावी. जरा जास्त तेल घालून फोडणी करावी. फोडणीत मेथ्या घालून बदामी रंगावर परतून घ्याव्या. नंतर त्यात कोथिंबीर घालून परतावी. एक-दोन वाफा आल्यावर त्याच चोचलेले आले, खारकांचे तुकडे व गूळ घालून पुन्हा जरा परतावे. नंतर खाली उतरवून गार झाल्यावर लिंबाचा रस घालावा. मीठ घालावे व लोणचे चांगले कालवून बरणीत ठेवावे.
हे लोणचे फार चांगले लागते व रंगही एक प्रकारचा वेगळाच व चांगला येतो. हे लोणचे साधारणपणे चार-पाच दिवस टिकते. फ्रीजमध्ये ठेवल्यास पुष्कळ दिवस टिकेल.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा