Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%b0 %e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%aa 110012700056_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोथिंबीर सूप

कोथिंबीर सूप
MH News
MHNEWS
पावसाळा संपल्यानंतर येणारा हिवाळा हा आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. विशेषत: या काळात मोठयाप्रमाणावर पालेभाज्या बाजारात उपलब्ध असतात. याच कालावधीत उत्तम हवामान लज्जतदार खाणे यामुळे शारिरिक सौंदर्य देखील वाढतांना दिसते. घरी परततांना बाजारात भला मोठा कोथिंबरीचा ढीग दिसला. सवयीने एक जूडी कोथिंबीर घेतली. नेहमीप्रमाणे कोथिंबीर वडया न करता वेगळा पदार्थ करावा असे सुचविले आणि त्यातून कोथिंबीर सूप या नवीन प्रकाराचा आस्वाद घेता आला.

सामुग्री: अर्धी जुडी कोथिंबीर काडयांसह, एक वाटी टोमॅटो आणि गाजर सालासह बारीक चिरुन, तीन-चार पाकळ्या लसूण, आले व मीठ चवीनुसार.

कृती: प्रथम कोथिंबीर निवडून घ्यावी. कोवळ्या काडयाही घ्याव्या. गाजर, कोथिंबीर, टोमॅटो स्वच्छ धुऊन चिरुन घ्यावे. त्यात मीठ व लसूण घालून कुकरमध्ये एकत्र शिजवावे. साहित्य शिजल्यावर बारीक वाटावे वाटलेल्या मिश्रणात गरजेप्रमाणे पाणी, किसलेले आले आणि चवीला हवे असल्यास मीठ घालावे. एक उकळी आणून गरम गरम सूप खायला द्यावे.

पचनास उपयुक्त, फायबरयुक्त, कमी कॅलरीयुक्त आणि पौष्टिक सूप काही मिनीटात तयार होते.

वरील कृती प्रमाणे आपण पालक सूप देखील बनवू शकतो. जरा हटके सूप पिणार्‍यांसाठी कोथिंबीर सूप हा प्रयोग करुन बघायला हरकत नाही.
(महान्यूज)

Share this Story:

Follow Webdunia marathi