गोलगप्यांचे एक पाकिट, मीठ घालून उकडलेले वाटाणे 2 वाट्या, 8-10 वाट्या भरून चिंचेचे आंबट-गोड पाणी.
कृती - एका प्लेटमध्ये गोलगप्पे घेऊन त्याला हाताने वरून फोडा. त्यात एक चमचा पांढरे वाटाणे घाला. पाणी एका वेगळ्या वाटीत द्या.
गोलगप्यांचे पाणी -
साहित्य - अर्धी वाटी चिंच उकळून, कोळून त्याचा गर, 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, 10-12 काड्या पुदिना, एक वाटी धुऊन चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, 5-6 काळे मिरे, 5-7 चमचे गुळ, अर्धा चमचा लाल तिखट.
कृती - सर्वांत आधी चिंच उकळून घ्यायची, मग ती थंड झाल्यावर ती कोळून घ्या नंतर त्यात गुळ टाका व पुदिना धुऊन घेऊन त्याची पाने बाजूला काढा. मिरच्यांचे बारीक तुकडे करा. आले किसून घ्या. एका ताटलीत कोथिंबीर, पुदिन्याची पाने व वर दिलेले सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक कर. या चटणीला साधारण मध्यम आकाराच्या पातेलीभर पाण्यात मिसळा व हलवा. झाले पाणी तयार. तिखट व मीठ आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा