लागणारे जिन्नस:
2 कप उकळलेले नूडल्स, 2-3 बारीक चिरलेले टमाटे, 1 काकडी (गोलाकारात चिरलेली), 1 गाजर (गोलाकारात चिरलेले), 1 कांदा बारीक चिरलेला, 2 चमचे डाळिंबाचे दाणे, चिरलेली कोथिंबीर.
गार्लिक सॉससाठी जिन्नस:
3 चमचे तेल, 1 चमचा बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप टोमॅटो केचअप, 2 चमचे चिली सॉस, चवीनुसार मीठ, एक चिमूट अजीनोमोटो, ऑरेंज रेड रंग.
तयार करावयाची कृती :
उकळलेल्या नूडल्सवर आरारोट किंवा कॉर्नफ्लोर शिंपडा. कुरकुरीत होईपर्यंत तळा. तळलेल्या नूडल्समध्ये भाज्या टाका. नींबू रस, गार्लिक सॉस आणि चवीनुसार मीठ टाका. वरून कोथिंबीर टाका. सर्व साहित्य टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. प्लेटमध्ये काटे चमचा आणि चमचा ठेवून सर्व्ह करा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा