छोल्यांसाठी साहित्य:छोले, आले-लसूण पेस्ट, कांदा, खोबरे, धने, मिरे, वेलची पूड, तमाल पत्र, तिळ, काजू, बडीशोप, टमाटे.कृती:
छोले रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. बनवितांना कूकरमध्ये उकळवून घ्या. आले-लसूण पेस्ट, कांदा, वेलची पूड, मिरी, भिजविलेले काजू व तिळ, टमाटे, बडिशोप, धने, खोबरे हे मिक्सरमधून एकत्र पेस्ट करून घ्या. नंतर कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी व तमालपत्र टाका. नंतर वरिल पेस्ट टाका. गुलाबी रंग आल्यावर त्यात तिखट, मसाला, हळद टाकून तेल सूटेपर्यंत हलवत रहा. त्यात छोले टाकून चवीनुसार मीठ टाका. आवडीप्रमाणे पाणी टाकून मिश्रणाला उकळी येऊ द्या. त्यात कोथिंबीर टाका.
भटूर्यांचे साहित्य :
मैदा, दही, ब्रेड क्रम्स, मीठ.
भटूर्यांची कृती :
मैद्यात दही व मीठ टाका. ब्रेड पाण्यात भिजवून टाका. थोडे-थोडे पाणी टाकून जास्त घट्टही नाही व सैलही नाही असे भिजवा. पाच तास झाकून हे मिश्रण मुरू द्या. व नंतर पुर्या लाटून तेलात तळून घ्या.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा