साहित्य- दीड वाटी बासमती तांदूळ, दीड टे.स्पू. तूप, २ टी. स्पू. जिरा, चवीनुसार मीठ, ३ वाटी पाणी.
कृती - तांदूळ धुवून पाणी घालून ३0-४0 मिनिटे भिजत ठेवा, मायक्रोवेव्हच्या प्लॅस्टिक बाऊलमध्ये तूप व जिरे टाकून झाकण न ठेवता हायवर (१00%) ३0 सेकंद ठेवा, नंतर तांदूळ मीठ-पाणी टाकून भांड्यावर क्लिंग फिल्म ताणून बसवून-फिल्मला समोरासमोर २ लहान चिरा द्या, हायवर १२-१३ मिनिटे शिजवा, शिजल्यावर भांडे बाहेर काढून ठेवा. वाढण्याआधी बाऊलवर झाकण ठेवून ते मायक्रोव्हेवमध्ये एक मिनिटासाठी ठेवून गरम करून घ्या.