ज्वारी पीठ- १ वाटी, बेसन पीठ- १/४ वाटी, तांदूळ पीठ- १/४ वाटी, कांदा (किसून)- २ चमचे, मीठ- चवीप्रमाणे, लाल तिखट- २ चमचे, जिरे पूड- १ चमचा, हळद, हिंग- १/४ चमचा, तेल.
कृती : प्रथम ज्वारीच्या पिठामध्ये बेसन व तांदूळ पीठ घालावे. त्यात मीठ, लाल तिखट, हळद, हिंग व जिरे पूड घालावी. नंतर कांद्याची पेस्ट, ओले खोबरे व बारीक चिरलेले कोथिंबीर घालून घट्ट मळून घ्यावे. मध्यम आकाराचे गोळे करून प्लास्टिकच्या पिशवीवर तेल लावून जाडसर थापून घेणे. त्यावर २-३ छिद्र करावीत. तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूने चांगले खरपूस भाजून घ्यावे. लोणी किंवा बटर लावून दही व शेंगदाणा चटणी बरोबर खाण्यास देणे.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा