Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टोमॅटो राईस

recipe
साहित्य:  1वाटी तांदूळ, 2 टोमॅटो, 2 चमचे तूप, 1 कांदा बारीक चिरलेला, जिरे, आले- लसूण- मिरची पेस्ट, दालचिनीचे लहान तुकडे, मीठ, साखर, ओले खोबरे, कोथिंबीर
 
कृती: तांदूळ धुऊन अर्धातास निथळत ठेवा. टोमॅटो पाण्यात शिजवून मिक्सरमधून काढून घ्या. पातलेल्यात तूप तापवा, जिरे, दालचिनी घालून कांदा परता. आले-लसूण- मिरची पेस्ट टाका. तांदूळ परतून मीठ व साखर घाला. टोमॅटोचे पाणी घालावे. हवं असल्यास अजून पाणी घालून मंद आंचेवर राईस शिजवा. वाढताना त्यावर ओले खोबरे व कोथिंबीर घाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi