लागणारे जिन्नस:
दीड वाटी तांदूळ, 50 ग्रॅम मटार, 50 ग्रॅम बटाटे, 50 ग्रॅम फूलकोबी, 50 ग्रॅम सिमला मिरची, 50 ग्रॅम गाजर, 50 ग्रॅम पनीर, तीन कांदे, कोथिंबीर, टोमॅटोचे स्लाइस, तेल, मीठ.
वाटलेले मसाले:
लसूण, 4-5 लाल मिरची, आल्याचा तुकडा, एक चमचा धने, अर्धा चमचा जिरे एकत्र करून वाटून घ्या.
करावयाची कृती:
पनीर, बटाटे, कांदे, शिमला मिरची, फूलगोभी कापून फ्राय करून घ्या. गाजर, मटार उकळवून घ्या. तांदूळ धुऊन मीठ टाकून शिजवून घ्या. शिजल्यानंतर त्याचे तीन भाग करा.
एका भागात खाण्याचा हिरवा रंग, एकात पिवळा रंग आणि एक भाग पांढराच राहू द्या. हिरव्या भातात हिरवे मटार, शिमला मिरची, पिवळ्या भागात गाजर, बटाटे टाका.
पांढर्या भागात पनीर, फूलगोबी आणि कांदे टाका. कढईत तेल गरम करून वाटलेला मसाला पाच मिनिटे भाजून घ्या. आणि तीनही प्रकारचा भात टाका. तयार केलेला ट्राय कलर पुलाव बाऊलमध्ये ओता. गरमा-गरम पुलाव कोथिंबीर पेरून सर्व्ह करा.