साहित्य : 1 कप हरभऱ्याची डाळ, 1/2 कप किसलेली कैरी, 2 चमचे तेल, फोडणीसाठी मोहरी, जिरं व हिंग, 1/2 टी स्पून हळद, 1 चमचा वाटलेली हिरवी मिरची, 5 -6 काड्या गोड लिंबाच्या, कोथिंबीर चिरलेली, साखर-मीठ चवीप्रमाणे, 2 चमचे जिरे पूड.
कृती : हरभऱ्याची डाळ 2-3 तास भिजत ठेवावी, नंतर त्याचे पाणी काढून थोडी जाडसर मिक्सरमधून काढून घ्यावी. तेलात मोहरी, जिरं आणि हिंग टाकून फोडणी तयार करावी. त्यात वाटलेली हिरवी मिरची आणि गोड लिंब टाकून परतावे व हळद टाकून लगेचच वाटलेली डाळ टाकावी. नंतर डाळीत सलाडाचे बाकी साहित्य घालून एकजीव करून सर्व्ह करावे. उन्हाळ्यात हे सलाड फारच रुचकर लागते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा