साहित्य : एक वाटी तुरीची डाळ, एक वाटी वांग्याच्या फोडी, २ चमचे तिखट, दोन ते अडीच चमचे मीठ, गूळ, लहान लिंबा एवढी चिंच, दोन चमचे काळा (गोडा) मसाला, एक चमचा जिरे, पाव वाटी सुके खोबरे, दोन चमचे धने, कोथिंबीर, कढीलिंब व फोडणीचे साहित्य.
कृती : डाळ शिजवून घ्यावी. फोडणीत कढीलिंब घालून वांग्याच्या फोडी घालाव्या. एक वाफ आणून घ्यावी व त्यात डाळ घालावी. नंतर तिखट, मीठ, गूळ व चिंच घालावी. धने, जिरे व खोबरे भाजून, कुटून घालावे व कोथिंबीर घालून डाळवांगे चांगले उकळू द्यावे. हे डाळवांगे आपल्या आवडीप्रमाणे दाट किंवा पातळ करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा