साहित्य : १ वाटी तांदुळाचे बारीक पीठ, १/४ वाटी चण्याचे पीठ, १ मध्यम बारीक चिरलेला कांदा, ५-६ पाकळ्या लसूण, १/२ इंच आले, ३ मिरच्या, /४ चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरते मीठ. कृती : तांदूळाचे पीठ, चण्याचे पीठ, हळद आणि मीठ एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून एकजीव करावे. गुठळ्या होऊ न देता पीठ घट्ट ताका एवढे पातळ भिजवावे. नंतर, तेल वगळता, बाकी साहित्य भिजवलेल्या पीठात मिसळावे.
नॉन-स्टीक तवा गरम करावा. त्याला तेलाचा पुसट हात लावावा. तवा गरम झाला की त्यावर डावभर पीठ टाकून, तवा गोल फिरवून पीठाचा थर पातळ करावा. वर झाकण ठेवावे. थोड्यावेळाने झाकण काढून सर्व बाजूने एक चमचाभर तेल सोडावे. बाजू जरा लालसर झाली की धीरडे उलटावे. दोन-तीन मिनिटे ठेवून खाली उतरावे. अशा प्रकारे सर्व धीरडी करून घ्यावी.
टीप:
घट्ट दह्यावर लाल तिखट, जीरे पूड, मीठ, बारीक चीरलेली कोथिंबीर भूरभूरून टाकावी. आणि त्या बरोबर वरील खमंग धीरडे खावे