Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%b8 %e0%a4%b8%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a4%a1 110012700060_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

न्यूट्रिशस सॅलड

न्यूट्रिशस सॅलड
MH News
MHNEWS
महाराष्ट्राला स्व:ताची अशी एक खाद्यसंस्कृती आहे. अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थाबरोबरच अन्य भारतीय खाद्यपदार्थ देखील लोक चवीने खातात. म्हणूनच अगदी महाराष्ट्रात मकेकी रोटी मिळते तर पंजाबात येथे झूनका भाकर मिळेल असा बोर्ड दिसतो. अगदी शिमल्याला गेलात किंवा कन्याकुमारीला गेलात तर तेथेही मुंबई भेळ ही पाटी हमखास दिसते. असे जरी असले तरी हेल्थ कॉन्शस असणार्‍या आणि खाण्यापिण्यावर प्रचंड कंट्रोल ठेवणार्‍यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विशेषत: उत्तम आरोग्य हे उत्तम आहाराशी जोडलं गेलं आहे. म्हणूनच आजच्या धावपळीच्या जीवनात बदलत्या जीवन शैलीशी एकरुप होतांना न्यूट्रिशस पदार्थ घेणे आवश्यक झाले आहे.

सामुग्री: एक छोटे सफरचंद, अर्धे पेरु, तीन-चार संत्र्याच्या फोडी, एक छोटी ढोबळी मिरची, एक गाजर, एक पान सेलवी दांडी, एक काकडी, तीन-चार बेदाणे, पाच-सहा स्कूप पपई व खरबूज, पाव कप गाईचे दूध (दह्यासाठी), कांदा, हिरवी मिरची, मोहरी पावडर, साखर, मीठ.

कृती: सफरचंद आणि पेरुच्या सालीसकट फोडी कराव्या. त्यात खरबूज व पपई घालावी. त्यात संत्र आणि बेदाणे घालावे. एक गाजर किसून काकडीच्या फोडी, ढोबळी मिरची बारीक चिरुन व सेलरीचे पान चिरुन घालावे. पाव कप गाईच्या दुधाच्या दह्याचा चक्का घ्या. त्यात एक चमचा कांदा चिरुन, पाव चमचा मोहरी पावडर फेटून आणि चवीला हिरवी मिरची पेस्ट, मीठ व पाव चमचा साखर घाला. या तयार ड्रेसिंगमध्ये वरील फळे व भाज्या घाला. गार करुन खायला द्या. यामधून जीवनसत्त्व 'अ' व 'क' मिळते. उत्तम रेषायुक्त तसेच प्रथिने व कॉल्शियमयुक्त आहे.

निरोगी व स्वस्थ शरीर ठेवण्यासाठी व्यायामाबरोबरच नैसर्गिक जीवनसत्व उपलब्ध करुन देणार्‍या पदार्थांचा आस्वाद घेणे गरजेच असते. जीवनसत्व देणारा हा खाद्यप्रकार अनुभवलाच पाहिजे.
(महान्यूज)

Share this Story:

Follow Webdunia marathi